फळबाग लागवड योजना 100% अनुदान अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेतीला पूरक व शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करणे तसेच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे या उद्देशाने ही योजना सन 2018-19 च्या खरीप हंगामापासून राज्यात राबविण्यात येत आहे.
यापूर्वी रोजगार हमी योजनेशी संलग्न फळबाग लागवड योजनांचा लाभ केवळ जॉबकार्डधारक शेतकऱ्यांपुरता मर्यादित होता. मात्र, राज्यातील बहुसंख्य अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी जॉबकार्ड नसल्यामुळे लाभापासून वंचित राहात होते. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र राज्यस्तरीय योजना सुरू करण्यात आली आहे.
फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांना पीक व पशुधनाबरोबरच दीर्घकालीन व स्थिर उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो. तसेच हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यास, मृदा व जलसंवर्धनास आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासही ही योजना सहाय्यभूत ठरते.
फळबाग लागवड योजना – 100% अनुदान योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत सहभागासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल मार्फत राबविण्यात येते.
पूर्वसंमतीनंतर लाभार्थ्याने 75 दिवसांत फळबाग लागवड पूर्ण करणे आवश्यक आहे. निर्धारित कालावधीत लागवड न केल्यास पूर्वसंमती रद्द करण्यात येते.
क्षेत्र मर्यादा
- कोकण विभाग : किमान 0.10 हेक्टर ते कमाल 10.00 हेक्टर
- इतर विभाग : किमान 0.20 हेक्टर ते कमाल 6.00 हेक्टर
लाभार्थी इच्छेनुसार एकापेक्षा अधिक फळपिकांची लागवड करू शकतो. 7/12 उताऱ्यानुसार संयुक्त खातेदार असल्यास संबंधित क्षेत्रापुरताच लाभ देण्यात येतो.
पात्रता निकष
- केवळ वैयक्तिक शेतकरी पात्र (संस्थात्मक लाभार्थी अपात्र).
- शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर 7/12 उतारा आवश्यक.
- अनुसूचित जाती-जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक, महिला व दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य.
- वनहक्क कायद्यानुसार वनपट्टा धारक शेतकरी पात्र.
- कुटुंबाची उपजीविका प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अग्रक्रम.
समाविष्ट कामे
शेतकऱ्याने स्वखर्चाने करावयाची कामे –
जमीन तयारी, खड्डे भरणे, खत व्यवस्थापन, आंतरमशागत, आवश्यक असल्यास कुंपण.
शासन अनुदानित कामे –
खड्डे खोदणे, कलमे/रोपे लागवड, ठिबक सिंचन, पीक संरक्षण, नांग्या भरणे.
तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी
पूर्वसंमतीनंतर कृषी सहाय्यकांकडून अंदाजपत्रक तयार केले जाते.
- 1 हेक्टरपर्यंत – तालुका कृषी अधिकारी मान्यता
- 1 हेक्टरपेक्षा जास्त – उपविभागीय कृषी अधिकारी मान्यता
प्रत्येक फळबाग प्रकल्प स्वतंत्र मानून मंजुरी दिली जाते.
अनुदान वितरण
या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने देण्यात येते.
पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% या प्रमाणात अनुदान वितरित केले जाते.
मंजूर अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट (DBT) वर्ग करण्यात येते.
अनुदानाच्या पुढील हप्त्यासाठी पहिल्या वर्षी किमान 80% व दुसऱ्या वर्षी किमान 90% झाडे जिवंत असणे आवश्यक आहे.
ठिबक सिंचन
फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन अनिवार्य असून यासाठी 100% अनुदान देण्यात येते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ई-ठिबक प्रणालीद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे.
कलमे / रोपे पुरवठा
कलमे व रोपे खालील प्राधान्यक्रमानुसार घ्यावीत –
- कृषी विभाग
- कृषी विद्यापीठे
- राष्ट्रीय बागवानी मंडळ मानांकित खासगी रोपवाटिका
गुणवत्तेची जबाबदारी संबंधित रोपवाटिकेची राहील.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Step by Step)
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन 2025-26 साठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर सुरू झाले आहेत. या योजनेत प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे.
खाली संपूर्ण अर्ज प्रक्रिया टप्प्याटप्प्याने दिली आहे.
🔹 Step 1: आवश्यक पूर्वतयारी
अर्ज करण्यापूर्वी खालील गोष्टी असणे आवश्यक आहे:
- Farmer ID (ग्रस्तक / AgriStack अंतर्गत)
- MahaDBT पोर्टलवर खाते (Account)
- आधार लिंक मोबाईल नंबर
- बँक खाते आधारशी लिंक
- 7/12 उतारा
Farmer ID किंवा MahaDBT खाते नसेल तर आधी ते तयार करा.
🔹 Step 2: MahaDBT पोर्टलवर लॉगिन करा
- MahaDBT – https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin अधिकृत वेबसाइट उघडा
- Farmer ID आणि OTP टाकून लॉगिन करा
- लॉगिन झाल्यावर डॅशबोर्ड दिसेल

🔹 Step 3: “घटकांसाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा
- डाव्या बाजूला “घटकांसाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा
मोबाईलवर अर्ज करत असाल तर Chrome Desktop Mode ON करा.
🔹 Step 4: फल उत्पादन विभाग निवडा
- खाली स्क्रोल करा
- फल उत्पादन (Fruit Production) विभाग शोधा
- पुढील पर्याय दिसतील:
- एकात्मिक फल उत्पादन विकास अभियान
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
- “बाबी निवडा” या बटनवर क्लिक करा
🔹 Step 5: शेताची व वैयक्तिक माहिती भरा
- गाव, तालुका, जिल्हा (Auto Fill)
- Farmer ID
- सर्वे नंबर / गट नंबर निवडा
- गट प्रकार: इतर घटक
🔹 Step 6: घटक व पीक निवड
- बाबीमध्ये निवडा:
- बाग लागवड – फळे / फुले / मसाले / औषधी पिके
- बाब निवडा:
- फळ पिके
- योजना निवडा:
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
- पीक निवडा:
- आंबा / पेरू / संत्रा / मोसंबी / डाळिंब इ.
🔹 Step 7: लागवडीचा तपशील भरा
- लागवडीचा प्रकार
- पिकांमधील अंतर (Spacing)
- प्रस्तावित क्षेत्र (एकर / गुंठे)
- क्षेत्र गुंठ्यामध्ये भरा
🔹 Step 8: माहिती जतन (Save) करा
- सर्व माहिती भरल्यानंतर “जतन करा” वर क्लिक करा
- आणखी पीक जोडायचे असल्यास Yes करा
- नसेल तर No निवडा
🔹 Step 9: अर्ज सादर करा
- मागील पेजवर जाऊन “अर्ज सादर करा” वर क्लिक करा
- निवडलेला घटक “पहा”
- Check Box ला टिक करा
- पुन्हा “अर्ज सादर करा” वर क्लिक करा
🔹 Step 10: चलन (Fee) भरणे
- ₹23 – ₹24 इतके नाममात्र शुल्क
- पेमेंट पर्याय:
- UPI
- Debit Card
- Credit Card
- PhonePe / Google Pay
पेमेंट झाल्यानंतर अर्ज Successfully Submitted होईल.
🔹 Step 11: अर्जाची खात्री
- अर्ज सबमिट झाल्याचा SMS मोबाईलवर येईल
- अर्जाची पावती (Receipt) डाउनलोड करून ठेवा
✅ महत्वाच्या सूचना
- लॉटरी पद्धत बंद असून First Come First Serve आहे
- लवकर अर्ज केल्यास लाभ मिळण्याची शक्यता जास्त
- एकापेक्षा जास्त घटकांसाठी एकाच वेळी अर्ज व पेमेंट करता येते
निष्कर्ष
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन, शाश्वत व उत्पन्नवाढीची महत्त्वाची योजना आहे. योग्य अंमलबजावणी, तांत्रिक मार्गदर्शन व पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून ही योजना राज्यातील फलोत्पादन क्षेत्राला नवी दिशा देईल.
हे पण पाहा– नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0- ठिबक आणि तुषार सिंचन सबसिडी – संपूर्ण माहिती – Krushi Kiran Hub

2 thoughts on “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 100% अनुदान साठी – असा करा ऑनलाईन अर्ज”