Krushi Kiran Hub

प्रधानमंत्री सूर्यघर(PM Surya Ghar yojana) मोफत बिजली योजना | ₹78,000 सबसिडी

आज आपण केंद्र सरकारच्या एक अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांसाठी फायदेशीर अशा प्रधानमंत्री सूर्यघर(PM Surya Ghar yojana) मोफत बिजली योजना बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 22 जानेवारी 2024 या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.


या योजनेत नागरिकांच्या घराच्या छतावर रूफटॉप सोलर सिस्टम बसवण्यात येणार असून, त्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर सबसिडी (अनुदान) दिले जाणार आहे.
ही योजना पूर्वीच्या राष्ट्रीय रूफटॉप सोलर पोर्टल अंतर्गतच राबवली जात असून, आता त्याचे नाव PM Surya Ghar Portal असे करण्यात आले आहे.


या योजनेत खालीलप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे:

सोलर प्रकल्पाची क्षमतामिळणारी सबसिडी (अनुदान)सबसिडीचे प्रमाण
1 किलोवॅट₹30,000सुमारे 60%
2 किलोवॅट₹60,000सुमारे 60%
3 किलोवॅटजास्तीत जास्त ₹78,000सुमारे 50%
3 किलोवॅटपेक्षा जास्तकमाल ₹78,000₹78,000 जास्तीत जास्त

म्हणजेच, सोलर प्रकल्पाच्या क्षमतेनुसार 50% ते 60% पर्यंत सबसिडी मिळते.


📄 आवश्यक कागदपत्रे

  • गेल्या 6 महिन्यांतील एक विजेचे बिल (PDF / JPG – 500 KB पर्यंत)
  • आधार संलग्न बँक खाते तपशील
  • कॅन्सल चेक / पासबुक कॉपी (2 MB पर्यंत)

🧮 सोलर कॅल्क्युलेटरची सुविधा

या पोर्टलवर Solar Rooftop Calculator उपलब्ध असून:

  • घराच्या छतावर उपलब्ध जागा
  • विजेची गरज
  • मंजूर भार
    यावरून तुम्हाला किती किलोवॅटचा सोलर प्रकल्प योग्य आहे हे कळते.

🏦 सबसिडी कधी मिळणार?

👉 पूर्ण इन्स्टॉलेशन झाल्यानंतरच सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.


🖥️ Step 1: वेबसाइट ओपन करा

आपण Chrome ब्राउझर ओपन करा
आणि सर्च करा – PM Surya Ghar yojana

👉 अधिकृत वेबसाइट आहे:https://pmsuryaghar.gov.in/#/

वेबसाइट उघडल्यानंतर

👉 आपण Consumer असल्यामुळे (मोबाईल- वरती असलेल्या तीन लाईन (Menu) वर क्लिक करा)
Consumer Login वर क्लिक करा.> Apply now


📱 Step 2: मोबाइल नंबर व OTP

  1. तुमचा मोबाइल नंबर टाका
    👉 शक्यतो जो नंबर वीज बिलला लिंक आहे तोच टाका
  2. कॅप्चा कोड भरा
  3. ✔️ Tick करून Verify वर क्लिक करा
  4. मोबाइलवर आलेला OTP टाका
  5. पुन्हा कॅप्चा भरा
  6. Login वर क्लिक करा

👤 Step 3: प्रोफाइल तयार करा

पहिल्यांदा लॉगिन केल्यावर
तुम्हाला प्रोफाइल तयार करायची स्क्रीन दिसेल.

इथे –

  • नाव: वीज बिलवर जसं आहे तसंच
  • Email ID: योग्य आणि अ‍ॅक्टिव्ह
  • State निवडा
  • District निवडा
  • Pincode टाका
  • पूर्ण पत्ता लिहा

👉 सगळी माहिती भरल्यानंतर
Save वर क्लिक करा.

✔️ तुमची प्रोफाइल तयार झाली.


☀️ Step 4: Rooftop Solar साठी अर्ज करा

आता
👉 My Applications वर जा
👉 Apply for Rooftop Solar Installation वर क्लिक करा

  1. State आणि District निवडा
  2. तुमची Electricity Distribution Company (DISCOM) ऑटोमॅटिक येईल
  3. Consumer Account Number (वीज बिलवरील) टाका
  4. Fetch Details वर क्लिक करा

👇 खाली

  • Sanction Load
  • Consumer Details
    सगळी माहिती दिसेल.

👉 Next वर क्लिक करा.


📍 Step 5: लोकेशन व सोलर डिटेल्स

  • Gender निवडा
  • Postal Address तपासा
  • Location Type: Urban / Rural
  • Solar Type: Residential
  • Proposed Capacity (उदा. 3 kW)

⚠️ लक्षात ठेवा:
लोडपेक्षा जास्त capacity टाकली तर सिस्टम accept करत नाही.


🗺️ Step 6: Map वर लोकेशन सिलेक्ट करा

👉 Pick from Map वर क्लिक करा

जर घर ओळखायला अडचण येत असेल तर
🔄 Satellite View सिलेक्ट करा
मग घर, रस्ता, झाडं सगळं क्लिअर दिसेल.

✔️ सोलर जिथे बसणार आहे तिथे क्लिक करा
✔️ Latitude – Longitude auto भरले जाईल
✔️ Select वर क्लिक करा


📄 Step 7: Documents Upload करा

  • मागील 6 महिन्यांतील कोणतंही वीज बिल PDF अपलोड करा
  • I Agree वर टिक करा

Give up Subsidy वर अजिबात टिक लावू नका
(लावल्यास सब्सिडी मिळणार नाही)

👉 Net Metering Agreement वाचा
👉 Accept करा


💾 Step 8: Draft Save व Submit

  1. Save as Draft
  2. वर View वर क्लिक करा
  3. खाली स्क्रोल करून Submit करा

✔️ पहिले 3 स्टेप पूर्ण होतील.


🏭 Step 9: Vendor Selection

  • आधीच वेंडरसोबत दर ठरवा
  • Click Here वर क्लिक करा
  • Vendor नाव सिलेक्ट करा
  • Shortlist / Select करा

👉 वेंडर नंतर बदलण्याचा ऑप्शन असतो.


🏦 Step 10: Bank Details भरा

  • Bank Name
  • IFSC Code
  • Account Holder Name
  • Bank Account Number
  • Cancelled Cheque / Passbook Photo अपलोड करा

⚠️ वीज बिल व बँक खात्यावरील नाव सेम असणं आवश्यक आहे


🔧 पुढील प्रक्रिया (Vendor & DISCOM)

  • Vendor Agreement upload करेल
  • Installation करेल
  • तुम्ही Installation approve कराल
  • DISCOM Net Meter लावेल
  • सर्व स्टेप approve होतील

💰 Step 11: Subsidy Redeem

👉 Redeem Subsidy वर क्लिक करा
👉 Vendor Feedback भरा
👉 Submit करा

✔️ Subsidy Request Successfully Submitted असा मेसेज येईल


👉 अधिक माहितीसाठी हा YouTube व्हिडिओ जरूर पाहा. https://www.youtube.com/watch?v=cd3hoFNWfdY

📌 महत्त्वाची माहिती

  • संपूर्ण खर्च आधी लाभार्थ्याला करावा लागतो
  • सोलर इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतरच
    👉 सबसिडी थेट बँक खात्यात जमा होते

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजना ही:

  • वीज बिल कमी करणारी
  • पर्यावरणपूरक
  • आणि दीर्घकाळ फायदेशीर अशी योजना आहे

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर ऑनलाईन अर्ज वेळेत करा.


👉 हेही नक्की वाचालेक लाडकी योजना: मुलीच्या भविष्यासाठी ₹1,01,000 ची सरकारी मदत


अशाच सरकारी योजना, अनुदान अपडेट्स आणि अर्ज मार्गदर्शनासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा.
नवीन अपडेटसह पुन्हा भेटू – धन्यवाद! 🙏