Krushi Kiran Hub

महाडीबीटी योजना: 33 लाख शेतकऱ्यांसाठी अंतिम सूचना – आज 9 जानेवारीपर्यंत कागदपत्रे सादर करणे बंधनकारक (Last date of mahadbt)


महाडीबीटी योजनेत निवड झालेल्या 33 लाख शेतकऱ्यांसाठी 9 जानेवारी (Last Date of Mahadbt) ही अंतिम मुदत आहे.
महाराष्ट्र राज्यातील सुमारे 33 लाख शेतकर सध्या महाडीबीटी (DBT) योजनेच्या लाभासाठी प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केला असून त्यांची निवड देखील झालेली आहे आणि आवश्यक कागदपत्रेही अपलोड करण्यात आली आहेत. मात्र, पूर्वसंमती न मिळाल्यामुळे हे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. संबंधित शेतकऱ्यांना 9 जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली असून, या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास अर्ज आपोआप रद्द होणार आहेत.


9 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत – एसएमएसद्वारे सूचना

कृषी विभागाकडून निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएसद्वारे 7 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत जर शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, तर 9 जानेवारीनंतर संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज रद्द करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


महाडीबीटी फार्मर स्कीम

  • केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण
  • राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण
  • कृषी उन्नती योजना
  • एकात्मिक फलोत्पादन योजना
    अशा सर्व योजनांची अंमलबजावणी केली जाते.

2020 पासूनचे अनेक अर्ज प्रलंबित होते. शासनाने हे अर्ज खरोखर लाभासाठी आहेत की फक्त अर्ज करून ठेवले आहेत, याची पडताळणी करण्यासाठी कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय पुन्हा खुला केला.

या पर्यायानंतर लाखो शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली, काहींना पूर्वसंमती मिळाली, अवजारे खरेदी करून बिलही अपलोड झाले.

मात्र निधीअभावी पुढील पूर्वसंमती देणे थांबवण्यात आले, तरीही शेतकरी कागदपत्रे अपलोड करत राहिले.

पूर्वसंमती न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड करण्याचा वेग कमी केला, तर काही शेतकऱ्यांनी निवड होऊनही कागदपत्रेच अपलोड केली नाहीत.


कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
खालील कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची आवश्यकता नाही:

  • सातबारा / 8-अ उतारा
  • गाव / शिवाराचा पत्ता
  • आधार क्रमांक
  • बँक खाते क्रमांक

मात्र, काही योजनांमध्ये खालील कागदपत्रे बंधनकारक आहेत:

  • यांत्रिकीकरण योजनांसाठी – दरपत्रक (Quotation)
  • फलोत्पादन योजनांसाठी – प्राकलन (Estimate)

👉 ही कागदपत्रे सादर न केल्यास अर्ज बाद केला जाईल.


पूर्वसंमतीबाबत महत्त्वाची माहिती

  • सध्या नवीन पूर्वसंमती दिली जाणार नाही, जरी कागदपत्रे अपलोड केली तरी.
  • पुढे निधी व लक्षांक उपलब्ध झाल्यानंतर, पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने पूर्वसंमती दिली जाईल.
  • या प्रक्रियेमुळे खरोखर लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी किती आहेत, हे शासनाला स्पष्ट होणार आहे.

महाडीबीटी प्रणालीचा थोडक्यात आढावा

  • 2015-16 : महाडीबीटी प्रणालीची सुरुवात – थेट बँक खात्यात अनुदान
  • 2017 : ऑनलाईन अर्ज व कागदपत्र अपलोड सुविधा
  • 2018-19 : बँक खाते अनिवार्य
  • 2019-20 : एसएमएस व मोबाईल अलर्ट सुविधा
  • 2020-21 : लॉटरी पद्धतीने निवड
  • 2025-26 : लॉटरी बंद, प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य धोरण लागू

निधीअभावी अडचणी?

या योजनांसाठी अंदाजे 15 ते 16 हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. मात्र, राज्याच्या तिजोरीतील निधीअभावी अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रे देऊनही पूर्वसंमती मिळत नसल्याची तक्रार आहे. काही शेतकऱ्यांच्या मते, पोर्टलवर पूर्वसंमतीचा पर्यायच उपलब्ध नाही.


शेवटची संधी – 9 जानेवारी (Last date of mahadbt)

आता देण्यात आलेली 9 जानेवारीपर्यंतची मुदत अत्यंत महत्त्वाची आहे. या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास अर्ज कायमस्वरूपी रद्द होण्याची शक्यता आहे.

महाडीबीटी कागदपत्रे कुठे अपलोड करायची?

अधिकृत महाडीबीटी पोर्टल

👉 https://mahadbt.maharashtra.gov.in or https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin


🪜 कागदपत्र अपलोड करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

1️⃣ महाडीबीटी पोर्टल उघडा
2️⃣ Applicant Login / शेतकरी लॉगिन करा
3️⃣ तुमचा User ID आणि Password टाका
4️⃣ My Applied Schemes / माझे अर्ज या पर्यायावर जा
5️⃣ संबंधित योजना निवडा
6️⃣ Upload Documents / कागदपत्र अपलोड करा या पर्यायावर क्लिक करा
7️⃣ आवश्यक कागदपत्रे (PDF/JPG) अपलोड करा
8️⃣ Submit / Save करून अर्ज अपडेट करा


👉 हेही नक्की वाचानमो शेतकरीचा 8वा हप्ता फक्त याच शेतकऱ्यांना (Namo Shetkari 8va hafta)


Leave a Comment