Krushi Kiran Hub

आजचा बाजारभाव: सोयाबीन, कापूस, आणि कांदा | 15 जानेवारी 2026

आज आपण देश आणि राज्यातील पाच महत्त्वाच्या शेतीमाल आजचा बाजारभाव सविस्तर आढावा घेणार आहोत. यामध्ये सोयाबीन, कापूस, कोथिंबीर आणि कांदा या पिकांच्या सध्याच्या बाजारस्थितीची माहिती दिली आहे.


🟡 आजचा बाजारभाव- सोयाबीन बाजारभाव

देशातील बाजारात सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम आहे. प्रक्रिया प्लांटमध्ये सोयाबीनच्या खरेदी दरात आजही क्विंटलमागे 20 ते 40 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या प्रक्रिया प्लांटचे दर 5300 ते 5400 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान पोहोचले आहेत.

बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा सरासरी बाजारभाव 4800 ते 5200 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. दर वाढल्यामुळे बाजारातील आवक काही प्रमाणात कमी झाली असून, दर स्थिरावल्यानंतर पुन्हा आवक वाढण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

बाजार समितीकिमान दर (₹/क्विंटल)कमाल दर (₹/क्विंटल)
लातूर₹4700₹5166
कटोल₹4200₹4901
मनोरा₹4200₹5150
हिंगणघाट₹3800₹5000
अकोला₹4050₹4995
अमरावती₹4800₹5200
अरवी₹3500₹4900
अष्टी₹4000₹4855
बाभुळगाव₹4000₹5220
चंद्रपूर₹4170₹4980
चंदूर बाजार₹3800₹5200
चंदूर रेल्वे₹4500₹5181
चिकली₹4150₹5270
दर्यापूर₹3550₹5050
धामणगाव रेल्वे₹4270₹5260

🟡 कापूस बाजारभाव

कापसाच्या बाजारात सध्या दर स्थिरावलेले दिसत आहेत. बाजारात कापसाची आवक अजूनही कमी आहे. मात्र उत्पादनासंदर्भात विविध चर्चा सुरू असल्यामुळे दरांमध्ये करेक्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील दोन दिवसांत कापसाच्या कमाल दरात सुमारे 200 रुपयांची नरमाई दिसून आली होती. तरीही सरासरी दर टिकून राहण्याची शक्यता असून, बहुतांश बाजारांमध्ये कापसाचा सरासरी भाव 8000 ते 8100 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

बाजार समितीकिमान दर (₹/क्विंटल)कमाल दर (₹/क्विंटल)सर्वसाधारण दर (₹/क्विंटल)
सावनेर₹7800₹7900₹7825
भद्रावती₹7750₹8100₹7875
पारशिवनी₹7700₹7950₹7850
घाटंजी₹7700₹8220₹7950
उमरेड₹8050₹8100₹8040
काटोल₹7400₹7950₹7700
सिंदी (सेलू)₹8120₹8290₹8200
वर्धा₹7650₹8250₹7900
वरोरा-शेगाव₹7850₹8050₹7900

🌿 कोथिंबीर बाजारभाव

कोथिंबीरीची आवक सध्या राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये वाढलेली आहे. अनेक भागांत प्लॉटची काढणी सुरू असल्यामुळे बाजारात पुरवठा जास्त झाला आहे.

यामुळे कोथिंबीरीचे दर काहीसे दबावाखाली असून, सध्या प्रति शेकडा 300 ते 700 रुपये इतके दर मिळत आहेत. गुणवत्ता आणि वाणानुसार दरांमध्ये फरक दिसून येतो. पुढील काही दिवस कोथिंबीरीची आवक चांगली राहण्याची शक्यता असल्यामुळे दर याच पातळीवर राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


🔴 कांदा बाजारभाव

कांद्याच्या बाजारात सध्या चढ-उतार सुरू आहेत. लाल कांद्याची आवक चांगली असली तरी एकूण कांद्याची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. रब्बी कांद्याची गुणवत्ता कमी झाल्यामुळे बाजाराची मदार प्रामुख्याने लाल कांद्यावरच आहे.

लाल कांद्याच्या आवकेनुसार दरात बदल होत असून, सध्या कांदा 1300 ते 1800 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान विकला जात आहे. पुढील काळातही कांद्याच्या दरात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.


निष्कर्ष

शेतकऱ्यांसाठी बाजारभावाची अचूक माहिती अत्यंत महत्त्वाची असते. दररोज बाजारातील हालचाली लक्षात घेऊन योग्य वेळी विक्रीचा निर्णय घेतल्यास अधिक फायदा मिळू शकतो.


हे पण पाहा– डाळिंब शेती माहिती: लागवड, खर्च, नफा व संपूर्ण मार्गदर्शन (2026)

Leave a Comment