Krushi Kiran Hub

आजचे बाजारभाव: सोयाबीन, कापूस, मका आणि कांदा | 10 जानेवारी 2026

आपण आज देशातील आणि राज्यातील पाच महत्त्वाच्या आजचे बाजारभाव सोयाबीन, कापूस, मका आणि कांदा शेतीमाल बाजारांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, मका, आणि कांदा या पिकांचे सध्याचे बाजारभाव, आवक-मागणीची स्थिती आणि पुढील काळातील अंदाज पाहणार आहोत.


🔹 आजचे बाजारभाव: सोयाबीन

देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा कायम आहे. दर वाढल्यामुळे बाजारातील सोयाबीनची आवक काहीशी कमी झाली आहे.
आज देशातील प्रक्रिया प्लांटमध्ये सोयाबीनचे भाव ₹5,200 ते ₹5,300 प्रति क्विंटल दरम्यान होते. तर खुल्या बाजारात सोयाबीन ₹4,800 ते ₹5,000 दरम्यान विक्री होत आहे.

दर सुधारल्यामुळे हमीभावाने (MSP) सोयाबीनची खरेदी कमी झाली आहे. पुढील काही काळात सोयाबीनची आवक मर्यादित राहण्याची शक्यता असून, त्यामुळे दर टिकून राहण्याचा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

बाजार समितीआवककिमान दर (₹)कमाल दर (₹)सर्वसाधारण दर (₹)
लातूर 450050504900
चंद्रपूर97430049504750
रिसोड1800455050004800
तुळजापूर638495049504950
धुळे27400046904650
सोलापूर54480051004880
अमरावती5307480050204900
जळगाव124486550005000
नागपूर884440051004920
हिंगोली820465051504900
जालना5721430053535350
अकोला7317430549804670
मालेगाव7482549004820
चिखली2700405052004650
वाशीम3300457552005800
वाशीम – अनसींग600455050004800
उमरेड1268400052004510
भोकरदन66460047504700
भोकर93473049804850
हिंगोली – खानेगाव नाका226450049004700
जिंतूर117470050804801
मुर्तीजापूर900440049304665
सावनेर105491050504980
पिंपळगाव (ब) – औरंगपूर भेंडाळी1450051004800
देउळगाव राजा25400049504900
अहमदपूर1828400050704880
औराद शहाजानी843480050404950
मुरुम264380049004750
नादगाव खांडेश्वर474440050854730
बाभुळगाव900395052004550
पुलगाव69445047704600
सिंदी (सेलू)266395049004800
देवणी56499051005000

🔹 कापूस बाजारभाव

देशातील बाजारात कापसाचे दर सुधारताना दिसत आहेत. आज अकोट बाजारात देशातील सर्वाधिक ₹8,500 प्रति क्विंटल दर मिळाला. दर वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून विक्री कमी झाल्याचे चित्र आहे.

सध्या खुल्या बाजारात कापूस ₹7,800 ते ₹8,100 सरासरी दराने विकला जात आहे. दर वाढल्यामुळे सीसीआय (CCI) ची खरेदी कमी झाली आहे.
यंदा कापसाचे उत्पादन कमी असून गुणवत्तापूर्ण मालाची कमतरता आहे. त्यामुळे कापसाच्या दरांना चांगला आधार मिळाला असून दर टिकून राहण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

बाजार समितीवाण / प्रकारकिमान दर (₹/क्विंटल)कमाल दर (₹/क्विंटल)
सिंदी (सेलू)अन्य7,8008,200
देऊळगाव राजादेसी7,8008,300
अमरावतीअन्य7,4007,800
उमरेडदेसी7,6507,800
भद्रावतीअन्य7,1508,250
अकोलादेसी7,6508,050
हिंगणघाटअन्य7,7308,100
घाटंजीLRA7,5007,900
हिंगणाअन्य7,8007,950
काटोलदेसी7,1007,850
अकोट देसी75008,500

🔹 मका बाजारभाव

मक्याचे दर मागील काही महिन्यांपासून स्थिर आहेत. यंदा मक्याचे उत्पादन वाढले असले तरी बाजारातील उठाव मर्यादित आहे.
मागील तीन वर्षांत इथेनॉलसाठी मक्याची मागणी चांगली होती. मात्र यंदा सरकारने तांदूळ आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस मंजुरी दिल्यामुळे इथेनॉलसाठी मक्याची मागणी कमी झाली आहे.

सध्या मक्याचे दर ₹1,700 ते ₹2,000 प्रति क्विंटल दरम्यान आहेत. पुढील काही दिवस हे दर स्थिर राहण्याची शक्यता मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.


🔹 कांदा बाजारभाव

देशातील बाजारात कांद्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. मागील आठवड्यापासून कांद्याच्या दरात नरमाई दिसून येत आहे. महत्त्वाच्या कांदा बाजारात खरीप कांद्याची आवक वाढली आहे.

आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर ₹1,200 ते ₹1,500 प्रति क्विंटल दरम्यान आले आहेत. पुढील काळात कांद्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे दरांवर दबाव वाढू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

बाजार समितीजात / प्रतआवक (क्विंटल)किमान दर (₹)कमाल दर (₹)सर्वसाधारण दर (₹)
लासलगावलाल14,76860019,001,600
पिंपळगाव बसवंतपोळ17,1005001,9001,450
लासलगाव – विंचूरलाल8,1386001,7001,400
येवलालाल8,0005001,6501,400
कोल्हापूर9,2935001,6001,250
चांदवडलाल9,2005501,7001,350
राहुरी – वांबोरीलाल10,8686001,8501,400
सांगली – फळे भाजीपालालोकल6,3796002,0001,400
छत्रपती संभाजीनगर2,7125501,7001,275
नागपूरलाल2,2009001,7501,450
पिंपळगाव (ब) – सायखेडालाल1,9357001,5001,350

🔔 निष्कर्ष

सध्या बहुतांश शेतीमाल बाजारात दर स्थिर ते सुधारते असल्याचे चित्र आहे. मात्र आवक, मागणी आणि सरकारी धोरणांवर पुढील बाजारभाव अवलंबून राहणार आहेत. शेतकऱ्यांनी विक्रीचा निर्णय घेताना बाजारातील घडामोडी लक्षात घेणे गरजेचे आहे.


हेही जाणून घ्या: आधुनिक कुक्कुट पालन: गावरान आणि ब्रॉयलर कोंबड्यांचे बदलते जग


Leave a Comment