Krushi Kiran Hub

रबी ई-पीक पाहणी 2025–26: मोबाईलवरून कशी करायची? संपूर्ण माहिती

रबी ई-पीक पाहणीची संपूर्ण माहिती जाणून घ्या. पिक पाहणी कशी करावी, आवश्यक कागदपत्रे, शेवटची तारीख, पीक विमा व शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवावा याची सविस्तर माहिती येथे वाचा.

भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य राहावे, त्यांना शासकीय योजना, पीक विमा व नुकसान भरपाई वेळेवर मिळावी यासाठी रबी ई-पीक पाहणी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अनेक वेळा माहितीअभावी किंवा उशिरामुळे शेतकरी या लाभांपासून वंचित राहतात. त्यामुळे रब्बी पिक पाहणीची संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

रब्बी हंगाम हा साधारणपणे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत येतो. या काळात पेरलेली पिके हिवाळ्यात चांगल्या प्रकारे वाढतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला काढणीस येतात. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, लसूण, वाटाणा ही प्रमुख रब्बी पिके आहेत.

रबी हंगाम 2025–26 साठी राज्य शासनाकडून रबी ई-पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. ही ई-पीक पाहणी 10 डिसेंबर 2025 ते 24 जानेवारी 2026 या कालावधीत शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. रबी हंगामातील पिकांची नोंद वेळेत केल्यास पीक कर्ज, पीक विमा, नुकसान भरपाई तसेच विविध कृषी योजनांचा लाभ मिळण्यास मदत होते.

म्हणून रबी हंगामात कांदा, हरभरा, गहू, ज्वारी इत्यादी पिके घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांनी रबी ई-पीक पाहणी 2025–26 निश्चित कालावधीत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

रब्बी पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये घेतलेल्या पिकांची सरकारी पातळीवर नोंद व तपासणी करणे. यामध्ये पिकाची स्थिती, क्षेत्रफळ, नुकसान झाले आहे की नाही याची माहिती नोंदवली जाते.

  • रब्बी पिक पाहणी खालील कारणांसाठी अत्यंत महत्त्वाची असते:
  • पीक विमा मिळण्यासाठी
  • नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास मदत मिळण्यासाठी
  • शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी
  • पिकांची अचूक नोंद ठेवण्यासाठी
  • सुरू: 10 डिसेंबर 2025
  • शेवट: 24 जानेवारी 2026

प्रत्येक जिल्ह्यात तारीख वेगळी असू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क ठेवावा.

  • गहू
  • हरभरा
  • ज्वारी
  • मका
  • कांदा
  • लसूण
  • वाटाणा
  • सूर्यफूल

⚠️ ई-पीक पाहणी का महत्त्वाची आहे?

ई-पीक पाहणीच्या आधारेच:

  • 🌾 पीक कर्ज
  • 💰 कर्जमाफी
  • ☔ पीक विमा
  • 💸 नुकसान भरपाई
  • 🚜 कृषी योजना

यांचा लाभ दिला जातो.

  • पीक पाहणी वेळेत पूर्ण करावी
  • चुकीची माहिती देऊ नये
  • पिकाचे स्पष्ट फोटो अपलोड करावेत
  • नोंद पूर्ण झाली आहे का ते तपासावे
  • स्मार्टफोन
  • इंटरनेट
  • GPS / Location ON
  • ई-पीक पाहणी App

🔽 Step 1: ई-पीक पाहणी App डाउनलोड करा

  • Google Play Store उघडा
  • “e-Pik Pahani / ई-पीक पाहणी” App शोधा
  • App Download / Update करा
  • App Open करा

🔐 Step 2: Consent आणि Permission द्या

  • Location Allow करा
  • Camera Allow करा
  • Message / Media Allow करा
  • Next – Next क्लिक करा

🗺️ Step 3: विभाग निवडा

  • राज्य
  • विभाग
  • जिल्हा
  • तालुका
  • गाव
  • योग्य विभाग निवडून Next करा.

📲 Step 4: लॉगिन प्रक्रिया

  • शेतकरी लॉगिन निवडा
  • मोबाईल नंबर टाका
  • OTP (संकेतांक क्रमांक) मागवा
  • आलेला OTP टाका
  • Login वर क्लिक करा

➡️ नोंदणी नसेल तर नवीन नोंदणी करा.

👨‍🌾 Step 5: खातेदार निवड / नवीन खातेदार नोंदणी

  • आधी नोंद असलेले खातेदाराचे नाव निवडा किंवा
  • नवीन खातेदार नोंदणी करा
  • जिल्हा, तालुका, गाव
  • नाव, खाते क्रमांक, गट नंबर
  • Search करून नोंदणी पूर्ण करा

🌱 Step 6: ई-पीक पाहणी सुरू करा

  • खातेदार नाव निवडा
  • पीक माहिती नोंदवा वर क्लिक करा
  • खाते नंबर व गट नंबर निवडा
  • एकूण क्षेत्र तपासा

🌾 Step 7: हंगाम व पीक तपशील भरा

  • हंगाम: रबी
  • पीक वर्ग:
  • निर्भेळ पीक / मिश्र पीक
  • पीक प्रकार:
  • पीक / फळबाग
  • पीक नाव:
  • कांदा, हरभरा, ज्वारी इ.
  • क्षेत्र: पूर्ण / अंशतः
  • सिंचन साधन व पद्धत
  • लागवड दिनांक भरा

🗺️ Step 8: नकाशा व फोटो अपलोड

  • जमिनीचा नकाशा (Map) दिसेल
  • Next क्लिक करा
  • पहिला फोटो – शेताचा
  • दुसरा फोटो – वेगळ्या कोनातून
  • GPS Distance, Latitude-Longitude Auto येईल

✅ Step 9: घोषणा व सबमिट

  • “वर दिलेली माहिती बरोबर आहे” अशी घोषणा द्या
  • Submit वर क्लिक करा
  • ➡️ तुमची ई-पीक पाहणी यशस्वीरीत्या अपलोड होईल.

✏️ Step 10: दुरुस्ती / Delete ऑप्शन

  • पीक माहिती पहा
  • गरज असल्यास:
  • Edit (दुरुस्ती)
  • Delete (काढून टाका)

निष्कर्ष

रब्बी पिक पाहणी ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. वेळेत आणि अचूक पिक पाहणी केल्यास भविष्यात पीक विमा, नुकसान भरपाई आणि शासकीय लाभ सहज मिळू शकतात. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी रब्बी पिक पाहणी गांभीर्याने करावी.

रब्बी पिक पाहणीसंबंधी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला यूट्यूब व्हिडिओ पहा.

हेसुद्धा वाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0- ठिबक आणि तुषार सिंचन 80 % सबसिडी – संपूर्ण माहिती

1 thought on “रबी ई-पीक पाहणी 2025–26: मोबाईलवरून कशी करायची? संपूर्ण माहिती”

Leave a Comment