Krushi Kiran Hub

लाडकी बहीण योजना हप्ता – नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी एकत्र? महिलांना 3,000 की 4,500 रुपये मिळणार का?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. या योजनेचा पुढील हप्ता पुढील महिन्यात महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारीपूर्वीच लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारी रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक महिलांना त्या तारखेकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महिलांच्या खात्यात ३,००० रुपये की ४,५०० रुपये जमा होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, उपलब्ध माहितीनुसार लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचा मिळून ३,००० रुपयांचा हप्ता देण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात शासनाकडून अधिकृत माहिती जाहीर होणे बाकी असून, महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणांची प्रतीक्षा करावी.

लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी केवायसी (KYC) करणे महिलांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसी प्रक्रियेसाठी सध्या शेवटचा आठवडा सुरू असून, 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपूर्वी सर्व लाभार्थी महिलांनी आपली केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

निर्धारित मुदतीत केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित महिलांना लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया गांभीर्याने घेऊन वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, अद्यापही लाखो महिलांची केवायसी प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसांची वाट न पाहता, जवळच्या अधिकृत सेवा केंद्रात किंवा सरकारी पोर्टलद्वारे तातडीने केवायसी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी KYC करणे अनिवार्य आहे. जर आधी KYC करताना काही चूक झाली असेल, किंवा माहिती बदलायची असेल, तर आता Edit / Re-KYC करण्याचा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अविवाहित, विधवा, घटस्फोटित, पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठीही KYC करण्याची सुविधा सुरू झाली आहे.

🔹 Step 1: अधिकृत वेबसाईट उघडा

🔹 Step 2: “येथे क्लिक करा” या पर्यायावर क्लिक करा

जर –

  • KYC करताना चूक झाली असेल
  • माहिती दुरुस्त करायची असेल
  • अजून KYC केली नसेल

तर “येथे क्लिक करा” (Click Here) या पर्यायावर क्लिक करा.

👉 लक्षात ठेवा: दुरुस्तीची संधी फक्त एकदाच मिळते

👉 अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2025

🔹 Step 3: आधार क्रमांक टाका

  • लाभार्थी महिलेचा आधार नंबर टाका
  • कॅप्चा भरा
  • “मी सहमत आहे” वर ✔️ टिक करा
  • OTP पाठवा वर क्लिक करा
  • आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल.

🔹 Step 4: OTP टाकून लॉगिन करा

  • आलेला OTP टाका
  • Submit वर क्लिक करा
  • यानंतर KYC फॉर्म उघडेल.

🔹 Step 5: वैवाहिक स्थिती निवडा

इथे नवीन पर्याय दिसतील:

  • ✅ विवाहित
  • ✅ अविवाहित
  • तुमची स्थिती योग्य ती निवडा.

🔹 Step 6: विवाहित महिलांसाठी पर्याय

▶️ पती हयात आहेत

  • पतीचा आधार क्रमांक टाका
  • OTP verify करा

▶️ पतीचे निधन झाले आहे

  • तो पर्याय निवडा
  • मृत्यू दाखल्याची झेरॉक्स
  • 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी

▶️ घटस्फोटित

  • घटस्फोटित पर्याय निवडा
  • संबंधित कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा करावीत

🔹 Step 7: अविवाहित महिलांसाठी पर्याय

▶️ वडील हयात आहेत

  • वडिलांचा आधार क्रमांक टाका
  • OTP verify करा

▶️ वडील हयात नाहीत

  • तो पर्याय निवडा
  • मृत्यू दाखल्याची प्रत
  • अंगणवाडी सेविकेकडे 31 डिसेंबरपर्यंत जमा करावी

🔹 Step 8: जात प्रवर्ग निवडा

  • Open / SC / ST / OBC / इतर
  • योग्य तो जात प्रवर्ग निवडा

🔹 Step 9: सरकारी नोकरी संबंधित प्रश्न

  • खालील दोन्ही प्रश्नांना “नाही” (NO) असे उत्तर द्या:
  • कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहेत का?
  • कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी आहेत का?

🔹 Step 10: संमती (Declaration) द्या

  • दिलेली माहिती खरी आहे यावर ✔️ टिक करा
  • आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा करणार असल्याची संमती द्या

🔹 Step 11: Submit करा

  • Submit वर क्लिक केल्यानंतर

👉 “तुमची KYC यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे” असा मेसेज दिसेल.

  • पुन्हा वेबसाईटवर जाऊन:
  • आधार क्रमांक टाका
  • OTP verify करा
  • जर KYC पूर्ण असेल तर confirmation message दिसेल.

2 thoughts on “लाडकी बहीण योजना हप्ता – नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी एकत्र? महिलांना 3,000 की 4,500 रुपये मिळणार का?”

Leave a Comment