Krushi Kiran Hub

लेक लाडकी योजना: मुलीच्या भविष्यासाठी ₹1,01,000 ची सरकारी मदत

लेक लाडकी योजना ही राज्यात मुलींच्या शिक्षणाला आणि भविष्यास हातभार लावण्यासाठी शासनाने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या पात्र मुलींना राज्य शासनाकडून एकूण ₹१,०१,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

अनेक पालकांना अजूनही या योजनेची सविस्तर माहिती नाही. त्यामुळे आज आपण सोप्या शब्दांत जाणून घेणार आहोत की ही योजना नेमकी काय आहे, कोणत्या मुलींना याचा लाभ मिळतो, पैसे किती आणि कधी मिळतात, अर्ज कुठे आणि कसा करायचा, तसेच कोणती कागदपत्रे लागतात.


लेक लाडकी योजना काय आहे?

याआधी राज्यात माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली जात होती. सन २०१७ मध्ये ती सुधारित करण्यात आली होती. मात्र नंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये ही योजना बंद करून, अधिक अनुदान देणारी लेक लाडकी योजना १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आली.

या योजनेचा उद्देश मुलींचे शिक्षण सुरू राहावे, त्यांचा आर्थिक भार कमी व्हावा आणि भविष्यात त्या स्वावलंबी व्हाव्यात, हाच आहे.


अनुदान किती आणि कशा टप्प्यांमध्ये मिळते?

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर पैसे दिले जातात.

योजनेचा हप्ताकधी मिळतोमिळणारा निधी
पहिला हप्तामुलीच्या जन्मानंतर₹5,000
दुसरा हप्ताइयत्ता पहिलीत प्रवेश केल्यावर₹5,000
तिसरा हप्ताइयत्ता सहावीत प्रवेश केल्यावर₹6,000
चौथा हप्ताइयत्ता अकरावीत प्रवेश केल्यावर₹8,000
पाचवा हप्ताजेव्हा मुलगी 18 वर्षांची होते₹75,000
एकूण रक्कम₹1,01,000

अशा प्रकारे एकूण ₹१,०१,००० रुपये थेट मुलीच्या बँक खात्यात जमा होतात.


कोण पात्र आहे? (पात्रता अटी)

  • मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ किंवा त्यानंतर झालेला असावा
  • कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाखांपेक्षा जास्त नसावे
  • कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे
  • लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्रातच असावे

👉 १ एप्रिल २०२३ नंतर एक किंवा दोन मुली जन्मल्या असतील तरी योजना लागू होते.
👉 एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीसाठी लाभ मिळतो.
👉 दुसऱ्या प्रसूतीत जुळ्या मुली झाल्या असतील तर दोन्ही मुलींना लाभ मिळतो.

महत्त्वाची अट

दुसरा आणि तिसरा हप्ता घेताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.


अर्जासाठी लागणारी कागदपत्रे

  • मुलीचा जन्म दाखला
  • कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
  • आई-वडिलांचे आधार कार्ड
  • दुसऱ्या हप्त्यापासून मुलीचे आधार कार्ड
  • बँक पासबुकची झेरॉक्स प्रत
  • रेशन कार्ड (पिवळे / केशरी)
  • शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
  • १८ वर्षांनंतर अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र
  • अंतिम हप्त्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी

लेक लाडकी योजना Form PDF डाउनलोड करा

लेक लाडकी FormDownload

अर्ज कसा करायचा?

सर्वप्रथम मुलीच्या जन्माची नोंदणी करणे आवश्यक आहे.

  • ग्रामीण भागात – ग्रामपंचायत
  • शहरी भागात – नगरपालिका / महानगरपालिका

जन्म नोंदणी झाल्यानंतर, संबंधित अंगणवाडी सेविकेकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा. प्रत्येक हप्त्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा. अर्जाचा नमुना सहसा माहिती देणाऱ्या ठिकाणी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध असतो.


निधीबाबत महत्त्वाची माहिती

मित्रांनो, नोव्हेंबर २०२५ अखेरीस या योजनेसाठी सुमारे ₹२० कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. याचा अर्थ योजना सध्या कार्यरत असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होत आहे.

जर तुमच्या घरात १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेली मुलगी असेल, तर ही योजना नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
अर्ज वेळेत करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

लेक लाडकी योजना – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1) लेक लाडकी योजना म्हणजे काय?

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या पात्र मुलींना एकूण ₹१,०१,००० रुपयांचे अनुदान टप्प्याटप्प्याने दिले जाते.

2) लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

ज्या मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ किंवा त्यानंतर झाला आहे आणि ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, अशा मुलींना या योजनेचा लाभ मिळतो.

3) या योजनेअंतर्गत एकूण किती रक्कम मिळते?

या योजनेतून एकूण ₹१,०१,००० रुपये थेट मुलीच्या बँक खात्यात जमा केले जातात.

4) अर्ज ऑनलाइन करायचा की ऑफलाईन?

सध्या लेक लाडकी योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागतो.

5) पैसे थेट कोणाच्या खात्यात येतात?

सर्व हप्त्यांची रक्कम थेट लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाते.

6) कुटुंबाचे उत्पन्न किती असावे लागते?

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाखांपेक्षा जास्त नसावे


अधिक माहितीसाठी तुम्ही हा YouTube व्हिडिओ पाहू शकता.

👉 हेही नक्की वाचाकडबा कुट्टी अनुदान | गाय-म्हैस, मुरघास व चारा बियाणे अनुदान 2026 – विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास योजना (ऑनलाईन अर्ज सुरू) – Krushi Kiran Hub


भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह! 🙏

2 thoughts on “लेक लाडकी योजना: मुलीच्या भविष्यासाठी ₹1,01,000 ची सरकारी मदत”

Leave a Comment